नगरमध्ये ‘हॉटेल डेस्टिनी’चे भव्य उद्घाटन; शहरातच गोव्याचा अनुभव : आ.संग्राम जगताप
नगर – शहरातील पर्यटन आणि खानपान क्षेत्राला नवे व आकर्षक रूप देणारे हॉटेल डेस्टिनी या हॉटेलचे आमदार संग्राम भैय्या जगताप आणि अक्षय दादा कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहर वेगाने विकसित होत असून, पर्यटन आणि खानपान क्षेत्रात नव्या सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ‘हॉटेल डेस्टिनी’सारख्या आधुनिक, आकर्षक आणि कुटुंबांसाठी सुरक्षित ठिकाणांच्या माध्यमातून शहराची ओळख आणखी मजबूत होईल.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच बाहेरील पर्यटकांनाही या भागाकडे आकृष्ट करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. शहरातील तरुणांनी असे नाविन्यपूर्ण उपक्रम उभारावेत, त्यांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देऊ. विठाई रिसॉर्टच्या बाजूला, शिवशंकर लॉन्ससमोर,आदर्शनगर, नगर–कल्याण रोड, अहिल्यानगर
शहराच्या गजबजाटापासून काही अंतरावर, शांत व निसर्गरम्य वातावरणात उभारलेले हे हॉटेल पाहुण्यांना “गोव्याचा अनुभव” देण्यास सक्षम आहे. प्रवेशद्वारातच लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक हेक्सागॉनल एलईडी स्ट्रिप्स ही त्याची खास वैशिष्ट्ये. येथे पाहुण्यांसाठी विशेष “फोटो पॉइंट”ची व्यवस्था करण्यात आली असून, सेल्फी व फोटोग्राफीसाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध होणार आहे.
लहान मुलांसाठी उभारलेला किड्स ग्रीन ग्रास गार्डन हे आणखी एक आकर्षण आहे. हिरवळीत सुरक्षितपणे खेळण्याची आणि मोकळेपणाने धावण्याची संधी या भागात मुलांना मिळते. कुटुंबांसाठी हे ठिकाण खास पसंतीचे ठरणार आहे.
यातील सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा भाग म्हणजे बीच सॅंड गार्डन. गोव्याची आठवण करून देणाऱ्या मऊ स्वच्छ वाळूमुळे आराम, थंडावा आणि रिलॅक्सेशनचा अनोखा अनुभव येथे मिळतो. पायाखाली जाणवणारी वाळू, शांत बसण्यासाठी केलेली व्यवस्था आणि लाइटिंग यामुळे अगदी बीचवर असल्याचा अनुभव पाहुण्यांना येतो.
कुटुंबांसाठी खास डिझाइन केलेले भव्यमान भारतीय बैठक (Bhartiya Baithak) फॅमिली रेस्टॉरंट पाहुण्यांना पारंपारिक वातावरणात शाकाहारी व मांसाहारी चविष्ट जेवणाचा आनंद देते. वाढदिवस, एंगेजमेंट, छोटे कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभासाठी सुसज्ज फंक्शन हॉल देखील उपलब्ध आहे. आकर्षक सजावट, आधुनिक सुविधा आणि सुटसुटीत बैठकव्यवस्था ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज, प्रशस्त व आकर्षक असे Hotel Destiny – Ahilyanagar आता पाहुण्यांच्या सेवेसाठी खुले झाले असून, उत्तम सेवा व उत्कृष्ट पाहुणचार देण्यास तत्पर आहे.
अहिल्यानगरमधील रहिवासी आणि पर्यटकांसाठी आता “गोवा इथेच आहे” असे म्हणता येईल, कारण हॉटेल डेस्टिनी शहराच्या पर्यटनाला नवे रूप देणारे ठरत आहे.
