नगर चोरी | नवनागापूरात मध्यरात्री घरफोडी
नगर चोरी | नवनागापूरातील घरफोडीत १ लाखांचा ऐवज चोरी
नगर चोरी | नगर : दर्शक । एमआयडीसी जवळील नवनगापूर परिसरात सम्राट एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ८ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेपासून ते ९ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप अंकुश दुसुंगे (वय ४०, रा. सम्राटनगर, नवनगापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरील खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेली सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
९ जुलै रोजी पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संदीप दुसुंगे यांनी पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. हेमंत थोरात यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
या प्रकरणी संदीप दुसुंगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताकलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.कॉ. रोहकले पुढील तपास करत आहेत.
