Crime News | चोरीचे सोने विकत घेणारा सोनार गजाआड ; दरोडेखोरांकडून १२ गुन्ह्यांची कबुली

Crime News | दोघा सराईत दरोडेखोरांसह चोरीचे सोने विकत घेणारा सोनार गजाआड
Crime News | नगर : दर्शक । पाथर्डी तालुक्यातील किर्तनवाडी येथे जून महिन्यात
झालेल्या धाडसी दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस
आणला असून या प्रकरणातील दोन सराईत दरोडेखोरांसह चोरीचे सोने विकत
घेणा या सोनाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत जबरी चोरी व
घरफोडीचे एकूण १२गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्यांच्या फरार
असलेल्या ७ आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
१ लाख ६३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता
किर्तनवाडी येथे १० जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास सात जणांनी
रावसाहेब बाजीराव किर्तने यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.
त्यांच्यासह पत्नीला मारहाण करून १ लाख ६३ हजार रूपयांचा ऐवज
जबरदस्तीने लंपास केला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या
मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार
आणि व्यावसायिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू ठेवला.
दरम्यान, ७ जुलै रोजी माहितीच्या आधारे संशयित आरोपी टाकळी
मानूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी
सापळा रचून राम कृष्णा चव्हाण (वय २२, रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड)
आणि करण रामनाथ भोसले (वय २०, रा. सारोळा कासार, ता. नगर)
या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी आपल्या इतर साथीदारांसह
किर्तनवाडी येथील दरोडा टाकल्याची कबुली दिली. या टोळीत राहुल रज्जाक काळे,
आदिशोक चंद्रभान चव्हाण, हनुमान कृष्णा चव्हाण, लक्ष्मण कृष्णा चव्हाण,
सागर नाबद चव्हाण, कडुबा ढोणे आणि विकास भोसले यांचा समावेश
असल्याचे समोर आले असून ते पसार आहेत.
तपासादरम्यान राम चव्हाण याने चोरीतील सोन्याचे दागिने
ओमकार पांडुरंग दहीवाळ (रा. चकलांबा, जि. बीड) याला विकल्याची माहिती दिली.
त्याबाबत चौकशी केली असता संबंधिताने समाधानकारक माहिती न दिल्याने
त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्या
विरोधात शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी,
घरफोडी व चोरीचे एकूण१२ गुन्हे उघडकीस आले.
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,
सहाय्यक पोलीस ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
यांच्या गणेश लोंढे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भिमराज खर्से,
भाऊसाहेब निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे
तसेच अंमलदार काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर,
किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे,
सागर ससाणे, प्रशांत राठोड, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.
