July 10, 2026

Fraud Crime | “नोकरीच्या आमिषाने 3.54 लाखांचा गंडा!”

0
image - 2026-07-10T194304.167

Fraud Crime | नगर : दर्शक । नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलीला नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन देऊन एका व्यक्तीची ३ लाख ५४ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध ९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शहादेव रामदास काळे (वय ४५, रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी अशोक तुळशीराम दाते (रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) याने शहादेव काळे यांची मुलगी वैष्णवी हिच्या नोकरीचे आमिष दाखवले. तुमच्या मुलीला अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरीला लावून देतो, असे खोटे आश्वासन देऊन आरोपीने काळे यांचा विश्वास संपादन केला.

Fraud Crime | त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ३,५४,८०० रुपये रोख रक्कम स्वीकारली.हा प्रकार १२ ऑक्टोबर २०२५ पासून ते आजतागायत फिर्यादीच्या घरी घडला. पैसे घेऊनही मुलीला नोकरी न लावल्याने आपली फसवणूक झाल्याचे काळे यांच्या लक्षात आले. अखेर ९ जुलै रोजी त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अशोक दाते याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो. नि. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. मरकड पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *