July 7, 2026

पिंपळगाव रोठा जिल्हा परिषद शाळेची गुणवत्तापूर्ण वाटचाल! पटसंख्या वाढली

0
shishyvruti.jpg

 पिंपळगाव रोठा जिल्हा परिषद शाळेची गुणवत्तापूर्ण वाटचाल! पटसंख्या वाढली



             


नगर : दर्शक । 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव रोठा या शाळेने यशाचा आणखी एक टप्पा पार केला आहे शाळेचा विद्यार्थी श्रीराज अरुण कंदलकर यांनी 230 गुण मिळवत इयत्ता पाचवी जिल्हा परिषद शासकीय शिष्यवृत्ती योजनेत गुणवत्ता यादीत आपला नंबर निश्चित केला आहे ,यापूर्वी या शाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत मल्हार सुरेश मुंढे सिद्धी,अशोक सुपेकरआणि अपर्णा किरण शिकारे आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आणि त्याचबरोबर मल्हार सुरेश मुंढे या विद्यार्थ्यांची टाकळी ढोकेश्वर या केंद्रीय नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.


 

                या सर्व यशामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव रोठा या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेवसे मॅडम,  संभाजी नरवडे सर आणि  सचिन शिंदे सर त्याचबरोबर कै. कुलट मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पिंपळगाव रोठा सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरील सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनतीने आणि अचूक मार्गदर्शनाने त्यांना यश संपादन करून दिले याबद्दल मुख्याध्यापक शिक्षक यांचे ग्रामस्थ मुंबईकर मंडळी यांच्या वतीने अभिनंदन  करण्यात आले        



         

           ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची पट संख्या कमी होत असताना देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव रोठा या शाळेत शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम ठेवल्यामुळे शाळेची पटसंख्या वेगाने वाढत आहे याचे सर्व श्रेय होतकरू मेहनती शिक्षकांना जाते. परिसरातील पालक, ग्रामस्थ यांनी ही शालेय साहित्य वाटप करून सहकार्य केले आहे.पालक विद्यार्थी पुन्हा जि.प. प्रा.शाळेकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *