July 7, 2026

महापौर ज्योतीताई गाडे यांची शमी गणपती मंदिरास सदिच्छा भेट

0
ganpati puja (1).jpg

 महापौर ज्योतीताई गाडे यांची शमी गणपती मंदिरास सदिच्छा भेट

महापौर ज्योतीताई गाडे यांची शमी गणपती मंदिरास सदिच्छा भेट


       


नगर : दर्शक । 

स्वयंभू शमी गणपती मंदिर हे अहिल्यानगर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा झाली होती.शमी गणपतीचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाले.



शमी वृक्षाच्या मुळापासून शमी गणपती तयार झाला आहे.येथे शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात.अशा पुरातन मंदिराची माहिती व ओळख होणे नवीन पिढी साठी महत्त्वाचे आहे.असे प्रतिपादन महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले आहे.



            दिल्लीगेट येथील शमी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने महापौर ज्योतीताई गाडे यांनी सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शमी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनायक देशमुख,नरेंद्र कुलकर्णी,पुजारी प्रमोद रेखी गुरुजी,जिल्हा ब्युटी असोसिएशनचे अध्यक्ष अनुजा कांबळे,ऋतुजा धोत्रे, महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य महेश कांबळे आदी उपस्थित होते.



            विनायक देशमुख म्हणाले, दिल्लीगेट वेशीतील शमी गणपती येथे मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येत असतात. स्वयंभू शमी गणपती हा 100 वर्षाहून अधिक काळापासून स्थापित झालेला असल्याने तो भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती आहे.शमी वृक्षाच्या पानाची पूजा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन प्रसंगी केली जाते. व त्यानंतर सोने लुटण्यात येते. अशी प्रथा आहे.त्यामुळे शमी गणपतीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *