September 14, 2026

ROTARY CLUB | आसिम शेख यांची रोटरी क्लब ऑफ पुणे एअरविंग्सच्या सचिवपदी निवड

image - 2026-09-14T134229.515

 ROTARY CLUB |  नगरचे भूमिपुत्र अभियंता आसिम गफ्फार शेख यांची रोटरी क्लब ऑफ पुणे एअरविंग्सच्या सचिवपदी निवड

ROTARY CLUB |  नगर : दर्शक । सामाजिक कार्य, उद्योजकता आणि नेतृत्वगुणांची दखल घेत नगरचे भूमिपुत्र अभियंता आसिम गफ्फार शेख यांची रोटरी क्लब ऑफ पुणे एअरविंग्सच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.


           आसिम शेख हे सत्कार फाउंडेशनचे संस्थापक असून, सत्कार फाउंडेशन हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे ऑनलाइन परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार परीक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. 

ते राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. गफ्फार शेख यांचे सुपुत्र आहेत.  तसेच, आसिम शेख हे सत्कार असोसिएट या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या व्यवसायसंस्थाचे सुद्धा संस्थापक असून, व्यावसायिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही ते सक्रियपणे कार्यरत आहेत.


        नगरच्या भूमीतून आपल्या कार्याची सुरुवात करून पुण्यातही त्यांनी सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा, कार्याचा आणि सेवाभावी दृष्टिकोनाचा विचार करून रोटरी क्लबने त्यांच्यावर सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.


         रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम, गरजू घटकांसाठी विविध सेवा प्रकल्प तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रात अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. नवीन जबाबदारी स्वीकारताना रोटरीच्या सेवाभावी विचारांना पुढे नेत समाजहितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प आसिम शेख यांनी व्यक्त केला.


त्यांच्या निवडीबद्दल रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य, मित्रपरिवार आणि   हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.