बडीसाजन ओसवाल युवक संघ शाडू मातीचे गणपती बनवा कार्यशाळेला प्रतिसाद
बडीसाजन ओसवाल युवक संघ व नगर जल्लोष, रेडीओ सिटी यांच्या शाडू मातीचे गणपती बनवा कार्यशाळेला प्रतिसाद

नगर : दर्शक । बडीसाजन ओसवाल युवक संघ आणि नगर जल्लोष (ट्रस्ट), रेडीओ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रसिद्ध शिल्पकार बालाजी वल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने, शाडूमातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेस सर्व स्तरातून उदंड असा प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेस १२५ च्या वर जणांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे उदघाटन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप,महापौर सौ.ज्योती गाडे, पेमराज बोथरा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आयोजक दोन्ही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.दोन्ही संस्था समजाभीमुख कार्य करण्यास पुढाकार घेत असते, असे कार्य त्यांच्या कडून नेहमी व्हावे अश्या शुभेच्छा त्यांनी दिले.यावेळी स्नेहबंधचे उद्धव शिंदे, हरियाली संस्थेचे खामकर आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नगर जल्लोष संस्थेचे सल्लागार प्रमुख सुहास मुळे, अध्यक्ष सागर बोगा, उपाध्यक्ष गुंजन शिंगवी, सौ.पल्लवी बोगा,खजिनदार दिपक गुंडू,सचिन बोगा,राहुल पाटोळे,प्रसन्न पाठक तसेच श्री बडीसाजन ओसवाल युवक संघचे अध्यक्ष मनोज चोपडा,सेक्रेटरी प्रविण शिंगवी,उपाध्यक्ष सचिन बडेरा,अक्षय भंडारी,सह सेक्रेटरी राहुल संचेती,सहखजिनदार संकेत राठोड,आदींनी परिश्रम घेतले.
