July 28, 2026

Arangao | बुवाजी बुवा मंदिरात  २७ हजार भाविक उपवास सोडायला आले 

image - 2026-07-28T121525.711

        Arangao | नगर : दर्शक । आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी  द्वादशीला साक्षात पांडुरंग उपवास सोडायला अरणगाव(मेहराबाद)येथील संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दिवसभर परिसरातील व नगरमधील सुमारे २७ हजार भाविक उपवास सोडण्यासाठी आले होते. 

             संतांची पावन भूमी असलेल्या नगरजवळील अरणगांव येथे श्री संत बुवाजीबुवा महाराज  यांची  संजीवन समाधी असलेल्या पुण्यभूमीत आषाढी सप्ताह,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला आषाढी एकादशीची पूजा संपन्न झाली,द्वादशीचा उपवास सोडण्यासाठी सुमारे २७ हजार भाविक आले होते.

             द्वादशी महाप्रसादचे अन्नदाते अरणगावचे महेश विठठ्ठल गहिले,  बाळासाहेब नारायण जाधव, श्री. संजय काका भाटी (शिरूर) यांच्यातर्फे भात ,आमटी व लापशीचा प्रसाद बनविण्यात आला.दुपारी १२ वा  सुरु झालेला महाप्रसाद रात्री १० वाजेपर्यंत चालू होता त्याचा लाभ भविकांनी घेतला.सर्व नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी केले होते