July 28, 2026

Pimpalgao | गर्कळ सर यांच्या राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार साठी पथकाने केली पाहणी 

image - 2026-07-28T122248.124

          नगर-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 अंतर्गत जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा या विद्यालयातील शिक्षक  भिकाजी शंकरराव गर्कळ सर यांनी या पुरस्कारासाठी नाव नोंदवले आहे.त्या अनुषंगाने आज शाळेत   लक्ष्मण सुपे साहेब अधिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण व संशोधन संस्था संगमनेर, कुमावत अरविंद, विस्तार अधिकारी पंचायत समिती अकोले , तसेच शिरसाट साहेब विषय तज्ञ पंचायत समिती पारनेर, सुरेश सोनवणे साहेब विषय तज्ञ पंचायत समिती पारनेर यांचे पथक आले होते त्यानी सर्व पाहणी केली 

          याप्रसंगी शाळेच्या वतीने त्याचा  सत्कार  विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक उंडे बी आर,ज्येष्ठ शिक्षक जरांगे एन.बी.,गर्कळ सर,केदारी एन.बी.यांनी केला.या पथका मार्फत ९ वी वर्गाची मराठी विषयाची 20 गुणांची परीक्षा घेण्यात आली व मराठी विषयाचा मागील ५ वर्षाचा निकाल पडताळण्यात आला व गुणदान करण्यात आले.