Rotary Club | रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचा 38 वा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा
Rotary Club | नगर : दर्शक । रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल चा 38 वा पदग्रहण समारंभ भव्य उत्सवात आणि मोठ्या उत्साहात सेलेस्टिया बँक्वेट्स अँड लॉन्स, सावेडी, अहिल्यानगर येथे पार पडला.
या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेश पटेल हे मुख्य अतिथी, असिस्टंट गव्हर्नर रो. माधव देशमुख हे विशेष अतिथी, आणि डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी रो. पारुल पटेल या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने झाली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक वृक्षाला पाणी घालण्याचा समारंभ पार पडला, ज्यातून रोटरीची पर्यावरण संवर्धनाप्रती बांधिलकी अधोरेखित झाली. क्लब सदस्यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.
मावळते अध्यक्ष रो.सुनील कटारिया यांनी अधिकृतपणे नेतृत्वाची सूत्रे नवीन अध्यक्ष रो. अमर गुरप यांच्याकडे सुपूर्त केली,तर रो. सुनील मुथा यांनी सचिव आणि रो. धीरज मुनोत यांनी खजिनदार म्हणून 2026–27 या रोटरी वर्षासाठी पदभार स्वीकारला.
नवीन पदग्रहण केलेल्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे आहे.
उपाध्यक्ष रो. मनीष बोरा,
संयुक्त सचिव व अध्यक्ष-नियुक्त रो. संजय मुनोत,आय पी पी व सी एस आर संचालक रो. सुनील कटारिया,
सर्जंट-ॲट-आर्म्स रो.सतीश कटारिया,संचालक सार्वजनिक प्रतिमा व क्लब लर्निंग फॅसिलिटेटर रो. ईश्वर बोरा, संचालक क्लब प्रशासन व क्लब ॲक्शन चॅम्पियन रो.प्रसन्न खाजगीवाले,
संचालक रोटरी फाउंडेशन व ग्लोबल ग्रँट्स रो. हरीश नय्यर,
संचालक सदस्यत्व व फेलोशिप रो. चेतन अमरापुरकर,
संचालक सामुदायिक सेवा प्रकल्प रो.गिरीश मुळे,संचालक वैद्यकीय सेवा रो. डॉ.दिलीप बागल,
संचालक व्यावसायिक सेवा रो.विजय जुंद्रे,
संचालक पोलिओप्लस रो. डॉ.श्रेया खाजगीवाले,
संचालक मानवतावादी सेवा रो.राजीव गुजर,
संचालक साक्षरता व वाॅश इन स्कूल्स (विंन्स) रो.राजेश परदेशी,संचालक विविधता, समता व समावेशन (डीईआय) रो. अजय गांधी,
संचालक व बुलेटिन संपादक रो.डॉ.कुणाल कोल्हे,संचालक आंतरराष्ट्रीय सेवा रो.हितेश गुप्ता,
संचालक युवा सेवा रो.निलेश मेहेर,संचालक माहिती तंत्रज्ञान रो.अतुल बोरा,
संचालक आर आय एम्फॅसिस रो. दत्ता दीक्षित, संचालक डिस्ट्रिक्ट एम्फॅसिस रो.उमेश रेखे,संचालक क्रीडा रो. अभिजीत कोठारी,
सल्लागार समिती मध्ये पीडीजी रो. शिरीष रायते आणि रो.डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचा समावेश आहे.
समारंभात सर्व नव-नियुक्त संचालकांचा सन्मान करून त्यांना रोटरी डायरेक्टर पिन्स प्रदान करण्यात आले. तसेच क्लबच्या नव्याने सामील झालेल्या सदस्यांचेही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.जयेश पटेल यांच्या हस्ते स्वागत करून त्यांना अधिकृत रोटरी पिन देण्यात आले.
मावळते अध्यक्ष रो.सुनील कटारिया यांनी मागील रोटरी वर्षातील क्लबच्या कामगिरीचा आणि सेवा प्रकल्पांचा आढावा सादर केला.आपल्या उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष रो.अमर गुरप यांनी वर्षासाठीची आपली दृष्टी मांडली. त्यांनी ग्लोबल ग्रँट, हॅपी स्कूल प्रोजेक्ट आणि रोटरीच्या सात फोकस क्षेत्रांवर आधारित शाश्वत सामुदायिक उपक्रम जाहीर केले. तसेच त्यांनी रोटरी फाउंडेशन (टीआरएफ) साठी सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले.
मुख्य भाषणात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.जयेश पटेल यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी अन्न्स यांचा आदि शक्ती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग अधोरेखित केला, ज्यामध्ये मी आदि शक्ती, माझे मन, माझी सुरक्षा आणि माझे आरोग्य या चार संकल्पनांवर भर देण्यात आला. त्यांनी पर्यावरणा साठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला ज्यामध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे पुनर्वापर करून टिकाऊ बाक तयार करून गरजू शाळांना देण्यात येतील. पंढरपूर वारी च्या मूल्यांचा उल्लेख करत त्यांनी त्यातील निःस्वार्थ सेवेची भावना आणि रोटरीच्या तत्त्वांतील साम्य अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक रोटेरियनला रोटरी इंटरनॅशनलप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचे आणि “क्रीएट लास्टिंग इंम्पॅक्ट” या थीम अंतर्गत समाजसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप सचिव रो. सुनील मुथा यांनी मनःपूर्वक आभार प्रदर्शन करून केला. या भव्य समारंभाला रोटेरियन, अन्न्स, अॅनेट्स, मान्यवर अतिथी आणि शुभेच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
