July 7, 2026

तोफखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा

0
image - 2026-07-01T210934.842.jpg

 तोफखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा 

तोफखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा





नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ । 

नगर
शहरातील तोफखाना परिसरात असलेल्या ठाकूर गल्लीत तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना तिघांना तोफखाना पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या कडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 



३० जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक प्रमुख उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना ठाकूर गल्ली येथे काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. 



त्यानुसार उपनिरीक्षक चाहेर पोलीस अंमलदार दिनेश मोरे, भानुदास खेडकर, सतिश शिंदे, सुमित गवळी, सुजय हिवाळे यांच्या पथकाने रात्री ९ च्या सुमारस तेथे छापा टाकला. त्यावेळी राजेंद्र रामनारायण राठोड (रा. ठाकूर गल्ली, तोफखाना), राहुल पोपट अहिरे (रा. भूषणनगर, केडगाव), सागर शंकर कुम्हे (रा. बोल्हेगाव) हे तिघे तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले.




 पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून १२८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. त्या तिघांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. दिनेश मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *