Nagar Music | ‘चिंब भिजलेले’ हिंदी- मराठी गीतांच्या मैफलीचे शनिवारी आयोजन
Nagar Music | नगर – श्रीपूजा इव्हेंट्स प्रस्तुत “चिंब भिजलेले” हा बहुप्रतीक्षित संगीतमय कार्यक्रम शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सावेडी येथील माऊली सभागृह येथे रंगणार आहे. पावसाळ्याच्या रम्य वातावरणात हिंदी व मराठीतील सदाबहार गीतांचा नजराणा रसिकांसमोर सादर केला जाणार असून, टॉप टेन म्युझिशियनसह लाईव्ह ऑर्केस्ट्रा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन श्रीकांत गडकरी यांचे असून, पूजा गडकरी या आयोजक म्हणून कार्यरत आहेत. या संगीतमय मैफलीत हेमंत नरसाळे, प्रदीप कुलकर्णी, ईस्टर पवार, रविंद्र बक्षी, अभिजित गायकवाड, डॉ. राहुल पंडित, किशोर जाधव, चंदर ललवाणी, अजय दगडे, डॉ. साईप्रसाद शिंदे, उमेश कोठाडिया, समीर खान, राजू क्षेत्रे आणि पवन फिरोदिया हे गायक-कलाकार आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
कार्यक्रमाला साथसंगत देणाऱ्या अनुभवी वादकांमध्ये एडविन परांजपे (कीबोर्ड), संकेत देहाडे (लीड गिटार), प्रकाश लगड (बेस गिटार), नरेंद्र साळवे (कीबोर्ड), श्रीकांत गडकरी (ऑक्टोपॅड/रिदम मशीन), अमोल कनगरे (सॅक्सोफोन), अमित साळवे (ढोलक/तुंबा), बबन साळवे (कॉंगो), यश वाडेकर (फ्लूट), सिद्धार्थ थते (तबला/कॉंगो) आणि विकी साळवे (आर्टीस्ट) यांचा समावेश आहे. त्यांच्या दर्जेदार साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक खुलणार आहे.
या कार्यक्रमासाठी काशीद हॉस्पिटल, मिडास सुझुकी, हॉटेल यश पॅलेस, हॉटेल यश ग्रँड, अनंता व्हेज रेस्टॉरंट, वर्ध ग्रीन्स रिसॉर्ट, आमी आणि वासन टोयोटा यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले आहे. तसेच ध्वनी व प्रकाशयोजनेची जबाबदारी हरमन प्रो ऑडिओ अँड लाईट्स ब्रीजेश बजाज यांनी स्वीकारली आहे.
पावसाच्या सरींसह सुरेल गीतांचा आनंद घेण्यासाठी आणि अविस्मरणीय संगीत मैफलीचा अनुभव घेण्यासाठी संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकांत गडकरी यांनी केले आहे.
