July 28, 2026

Nagar Shivsena | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त चाचणी शिबिर उत्साहात संपन्न

image - 2026-07-28T115856.634

Nagar Shivsena | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे शिवसेनेचे मोफत रक्त चाचणी शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

Nagar Shivsena | नगर : दर्शक । माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत व सवलतीच्या दरातील रक्त चाचणी शिबिर सोमवारी उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध रक्त चाचण्यांचा लाभ घेतला.

मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (मेट्रोपोलिस लॅब) यांच्या तांत्रिक सहकार्याने भिस्तबाग चौक, सावेडी येथील मेट्रोपोलिस लॅबमध्ये सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये थायरॉईड (TSH), कोलेस्टेरॉल यांच्या चाचणी मोफत करण्यात आल्या. तर शुगर (F&PP), बॉडी व्हायटल पॅकेज या चाचण्या अत्यल्प दरात करण्यात आल्या. तसेच इतर विविध रक्त चाचण्यांवर ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली होती. १२५ हून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

यावेळी बोलताना अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राजकारणा बरोबर समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक हित लक्षात घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जनतेच्या हिताचा उपक्रम राबविणे. पुढील काळातही ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून अशाच विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.

शहर शिवसेनेने शिबिर यशस्वी करण्यासाठी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडच्या सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे तसेच उपस्थित राहून लाभ घेतलेल्या सर्व नागरिकांचे यावेळी आभार मानले.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, उपशहर प्रमुख सुनील भोसले, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश खोडदे, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, राम वाणी, राम झिने, महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड, उषा भगत, शैला लांडे, वेणूबाई वाणी, रजनी ताठे, विकेश गुंदेचा, सागर चाबुकस्वार, चंद्रकांत उजागरे, सचिन नवघिरे, शंकर आव्हाड, गणेश आपरे, राम धोत्रे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, विजय शिरसाट, महावीर मुथा, किशोर कोतकर, आप्पा लांडगे, बाबासाहेब वैरागर, जयराम आखाडे, सुमित चव्हाण आदींसह शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.