Samarth School | शिष्यवृत्ती परीक्षेत श्री समर्थ प्रशालेची देदिप्यमान कामगिरी
Samarth School | यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे व पालकांचे सहकार्य व मार्गदर्शन
Samarth School | नगर : दर्शक । फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या परीक्षेत श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेत शालेय समिती चेअरमन मा. ॲड .श्री किशोरजी देशपांडे सर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन ॲड.श्री. देशपांडे सर , मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी मॅडम, पर्यवेक्षक श्री. एल. कुलकर्णी, इयत्ता आठवीचे मार्गदर्शक शिक्षक सौ. शास्त्री मॅडम, श्री. पथवे सर, सौ. मेलगर मॅडम, तसेच इयत्ता पाचवीच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. प्रियंका कासार (बांगर), सौ. चैताली गोरे (नवले) आणि श्री. संकेत शिंदे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
शालेय समितीचे चेअरमन मा.श्री. देशपांडे सर म्हणाले, “शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला योग्य दिशा देणारी परीक्षा आहे. श्री समर्थ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम ठेवावी.”
मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी यांनी आपल्या सांगितले, “विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या विश्वासाचे फलित आहे. शिस्तबद्ध अभ्यास, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी राज्यस्तरावर चमकावेत, यासाठी प्रशाला कटिबद्ध आहे.”
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी
ऋषभ नागरगोजे – २६८ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा), आस्था भंडारी – २५६ गुण (१७ वी), प्रांजल बोरकर – २३८ गुण (४९ वी), साईश पालवे – २३६ गुण (५६ वा), श्रीनय कोठुळे – २३० गुण (७८ वा), शेटे – २२६ गुण (९१ वा), अद्वैत धनेश्वर – २१८ गुण (१३२ वा), सुयोग निकम – २१६ गुण, केतकी लुमपाटकी – २१२ गुण (१७८ वी), अदिती जाधव – २०६ गुण (२४४ वी), प्रियांजली पालवे – २०४ गुण (२६२ वी)
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी
स्मित गायकवाड – २६२ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत ३० वा), सर्वेश मुटकुळे – २३६ गुण (११० वा)
यश घोरपडे – २३६ गुण (११६ वा), सात्विक दातीर – २३४ गुण (१२० वा) .
