Maratha Foundation | अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टतर्फे हजारो वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा
Maratha Foundation | “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा!” अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टतर्फे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा
नगर : दर्शक । Maratha Foundation | आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आगमन होताच अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात भव्य वारकरी सेवा उपक्रम राबविण्यात आला. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा” या भावनेतून सुमारे ८ ते ९ हजार वारकरी बांधवांना पिण्याचे थंड पाणी, राजगिरा लाडू, बिस्किटे तसेच अल्पोपहाराचे निस्वार्थ वाटप करण्यात आले.
या सेवाकार्यात राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले, महापौर ज्योतीताई गाडे, मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे तसेच संचालक मंडळातील सदस्यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा केली व स्वयंसेवकांचे मनापासून कौतुक केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज सोनवणे, अशोक गाढे, संदीप नवसुपे, भरत सुंबे, सिद्धांत पानसरे, निलेश सुंबे, संतोष बेरड, संजय शिंदे, अनुराधा ताई येवले, सागर भोसले, शशिकांत भांबरे, गणेश नाईकनवरे, मयूर पवार, चि. मित गाढे, विलास तळेकर, सोमनाथ गुंड, मिलिंद जपे, महादेव कोतकर, संदीप जगताप, राम जरांगे, भरत भोसले, कु. शुभरा भोसले, अक्षय तोडमल, श्रीपाद दगडे, गजेंद्र दांगट, चि. रितेश सोनवणे, वैभव भोगडे, जगू निमसे तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम घेतले.
या सेवा उपक्रमासाठी खासदार निलेश लंके व नवले मेडिकलचे पंकज गुलाब जपे हातवळण तसेच पादीर साहेब केडगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, त्यांच्या मुखातून अखंड घुमणारा “विठ्ठल… विठ्ठल…” चा गजर आणि स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. समाजसेवा, मानवता आणि विठ्ठलभक्तीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे वारकरी, नागरिक आणि मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.
“सेवा हाच धर्म, मानवता हाच आमचा संकल्प” या ध्येयाने प्रेरित होऊन अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्ट भविष्यातही समाजहित, वारकरी सेवा आणि विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
