July 16, 2026

Residential High School रेसिडेन्शिअलचा शिष्यवृत्ती परीक्षेत मानाचा तुरा; ३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत 52 पात्र

IMG-20260714-WA0011

Residential High School रेसिडेन्शिअल हायस्कूलचा शिष्यवृत्ती परीक्षेत मानाचा तुरा; ३ राज्य गुणवत्ताधारक, ५२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Residential High School नगर : दर्शक । रेसिडेन्शिअल हायस्कूल,

अहिल्यानगर येथे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन

करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दरे साहेब होते.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. मुकेश मुळे तसेच

खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम उपस्थित होत्या.

          यावर्षी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे ३ विद्यार्थी

राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले असून

२१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तसेच इयत्ता पाचवी

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे ३१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव व्ही. व्ही. यांनी

प्रास्ताविक करत शिष्यवृत्ती परीक्षेचा सविस्तर लेखाजोखा मांडला.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून यशामागील परिश्रम, नियमित अभ्यास,

शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.

           प्रमुख पाहुणे श्री. मुकेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे वाढते

महत्त्व समजावून सांगितले. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन

लवकरच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी कोडींग शिक्षणाची सुविधा उपलब्ध

करून देण्यात येणार असल्याची आनंददायी घोषणा त्यांनी केली.

         अध्यक्षीय समारोपात श्री. रामचंद्र दरे साहेब यांनी विद्यालयाने

शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल

समाधान व्यक्त केले. या यशामागील शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन,

विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यांचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित

        कार्यक्रमाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. पवार बी. एम., पर्यवेक्षक श्री. म्हस्के डी. सी., श्री. शरद सोनवणे, सौ. मरकड व्ही. के., सौ. वैशाली दारकुंडे तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवींद्र देवढे यांनी प्रभावीपणे केले, तर उपप्राचार्य श्री. वांढेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

           विद्यार्थ्यांना श्री नारळे जे. एन.,श्री कुटे एच.डी.,सौ मरकड व्ही. के , श्रीम ठुबे एम. यू, श्रीम. काळदाते जे. एस. श्रीम. चव्हाणके ए. सौ. धामणे जे. एस., श्री पाटील पी. ए., सौ दरे एस. बी., सौ. हराळ एम.पी., श्रीम म्हस्के पी. बी.,सौ साठे एस. पी., सौ निवडुंगे जे. एस., श्री अमृते पी. एम. श्री गावडे आर. आर.यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.