July 16, 2026

Ahmednagar College | करिअर संसद विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाठी दिशा दर्शक – डॉ.कुलकर्णी

image - 2026-07-16T211939.271

Ahmednagar College | जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त अहमदनगर महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकारी शपथग्रहण समारंभ संपन्न

Ahmednagar College | नगर : दर्शक । महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि अहमदनगर महाविद्यालय,

अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा

उपक्रमांतर्गत जागतिक युवा कौशल्य दिन (१५ जुलै) निमित्त करिअर

संसद पदाधिकारी शपथग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

           कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी,

उपप्राचार्य डॉ. दिलीपकुमार भालसिंग, उपप्राचार्य डॉ. विलास नाबदे तसेच

प्रबंधक (रजिस्ट्रार) श्रीमती कल्पलता भिंगारदिवे उपस्थित होते.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे

यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Ahmednagar College | १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित

            संयुक्त राष्ट्र महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण (SDG-4) आणि सन्मानजनक रोजगार व आर्थिक विकास (SDG-8) या शाश्वत विकास उद्दिष्टांना चालना देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. याच उद्देशाने महाविद्यालयात करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

करिअर संसदेच्या मंत्रिमंडळात पुढील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली : • मुख्यमंत्री – रोहित बप्पासाहेब काकडे • नियोजन मंत्री – स्नेहल कैलास गोरडे • कायदा व शिस्तपालन मंत्री – कोमल भाऊसाहेब सटाले • सामान्य प्रशासन मंत्री – साक्षी सुरेश भोसले • माहिती व प्रसारण मंत्री – सुहानी मुकुंद वाबळे • उद्योजकता विकास मंत्री – गीतांजली भगवान जगताप • स्वयंरोजगार विकास मंत्री – पंकज किशोर घोडके • कौशल्य विकास मंत्री – ज्ञानेश्वरी धनंजय जाधव • संसदीय कामकाज मंत्री – शशिकांत विनोद गोरडे • महिला व बालकल्याण मंत्री – श्रुती सुभाष वांडेकर • सभासद – श्रद्धा जालिंदर कोरडे, यावेळी विद्यार्थ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

          अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले की, “करिअर संसद हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी, नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून उपलब्ध होणाऱ्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा.”

या प्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुधीर वाडेकर व डॉ. सचिन राळेगणकर उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन करिअर कट्टा समन्वयक डॉ. भागवत परकाळ यांनी केले.